सावंतवाडी । प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्यातील तळकट देऊळवाडी येथील अंकुश यशवंत तळकटकर(95) यांचे नुकतेच मुंबई येथील निवासस्थानी निधन झाले. अंकुश तळकटकर हे अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जायचे . त्यांनी गावच्या सर्वच लोकांशी सलोख्याचे संबंध ठेवले होते. एक अतिशय सर्वज्ञात असलेली व्यक्ती व गावच्या अडीअडचणीत भाग घेणारी व्यक्ती म्हणून त्यांचा वावर होता. त्यांच्या जाण्याने तळकट गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात चार मुलगे उत्तम ,अशोक, कृष्णा, ज्ञानेश्वर,सुना ,नातवंडे असा परिवार आहे. माजी सरपंच रामचंद्र सावंत यांनी तळकटकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे .श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीचे कर्मचारी ज्ञानेश्वर तळकटकर , रेल्वेचे कर्मचारी कृष्णा तळकटकर यांचे ते वडील होत.









