ओटवणे प्रतिनिधी
बावळाट मुलांडावाडी येथील रहिवाशी अंकुश कृष्णा सावंत (८४) यांचे सोमवारी ७ जुलै रोजी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत सावंत कुटुंबीयांचे सांत्वन केले. मंगळवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सहा मुली, सुन, पुतण्या, नातवंडे, जावई असा परिवार आहे. मुंबईस्थित संतोष सावंत, ओटवणे ग्रामपंचायत सदस्या सौ मनाली गावकर यांचे ते वडील, कृष्णा सावंत यांचे ते काका तर ओटवणे माजी उपसरपंच बाबाजी गावकर, सावंतवाडी येथील सखाराम गावडे, ओटवणे येथील मनोहर म्हापसेकर, ओटवणे हायस्कूलचे कर्मचारी मंगेश गावकर यांचे ते सासरे होत तसेच सोनुर्ली येथील आनंद गांवकर आणि वजराट येथील लिलाधर परब याचे ते आजोबा होत.









