वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची अव्वल महिला टेनिसपटू अंकिता रैनाने नुकत्याच झालेल्या आयटीएफ महिलांच्या 50 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले. तब्बल 9 महिन्यांनंतर रैनाला हे पहिले जेतेपद मिळत आहे.
या स्पर्धेतील महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात बिगरमानांकित जोडी अंकिता रैना आणि तिची ब्रिटनची साथिदार नैखता बेन्स यांनी अमेरिकेच्या जेस्सी अॅने आणि जेसिका फाल्ला यांचा 6-4, 3-6, 10-8 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला.









