सांगली / संजय गायकवाड :
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग आणि सांगली-कोल्हापूर या दोन महत्वाच्या मार्गाना जोडणारा अंकली फाटा चौक छोट्या मोठ्या अपघातांचा केंद्रबिंदू ठरू लागला आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग असे येथे एकत्र आल्याने या चौकातून ये-जा करणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. येथे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चौक आणि वळण रस्त्यांची माहिती देणारे मोठे फलक लावण्याची आवश्यकता आहे.
अंकली फाटा हा सांगली-कोल्हापूर रोडवरील महत्वाचा चौक झाला आहे. केवळ सांगली कोल्हापूरच नव्हे तर अलिकडेच पूर्ण झालेल्या आणि अंकलीपर्यंत येऊन थांबलेल्या नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गामुळे या चौकातील वाहनांची संख्या चौपट झाली आहे. दिवसरात्र येथून वाहनांची ये जा सुरू असते. अंकली फाटा चौक पुर्वपिक्षा खूपच रुंद आणि मोठा झाला आहे. त्यामुळे येथून वळणाऱ्या वाहनांना अंदाज येत नाही. त्यामुळे येथे हमखास छोटे मोठे अपघात होतात.
अंकली फाट्याजवळ अनेक वीटभट्ट्या आहेत. या चौकाला सांगली, कोल्हापूर, मिरज आणि हरिपूर अशा चार वेगवेगळ्या मार्गाने आलेले रोड जोडलेले आहेत. नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे अंकलीपासून कोल्हापूर जिल्हयात पुढील टप्प्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे नजिकच्या काही वर्षात ज्यावेळी थेट रत्नागिरीपासून ज्यावेळी वाहतूक सुरू होईल त्यावेळी या मार्गावरील वाहनांची संख्या आणखी वाढणार आहे. वीटभट्ट्यांकडील विटांची व मातींची वाहतूक करणारे ट्रक, फळ मार्केटकडे ये जा करणाऱ्या छोट्या मोठ्या गाड्या पासह खारागी आरामगाडयांची संख्या मोठी आहे. ऊस हंगामावेळी शिरोळ आणि इचलकरंजी भागाकडील साखर कारखान्याकडे जाणाऱ्या गाडयाही या चौकातून पुढे जातात.
दुसरीकडे मिरज आणि मराठवाडयाकडील जिल्ल्यांकडे जाणारी वाहनेही याच चौकातून पुढे जातात. अंकली फाटा चौकात अतिक्रमणांचा प्रश्न नाही. येथे चहानाष्टयासाठी दिवसभर अनेक वाहने थांबतात. ही वाहने रस्त्यांच्या कडेला उभी केली जातात. या वाहनांना शिस्त लावण्याची आवश्यकता आहे. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडील पोलीस कर्मचारी येथे थांबून असतात. काही वेळेला वाहतूक शाखेचेही पोलीस असतात. पण येथे केवळ पोलिसांची नियुक्ती करून उपयोग नाही. अपघात होणार नाहीत. अशा ठिकाणी वाहने पार्क करण्यासंदर्भात वा वाहने उभी करण्याबाबत पोलिसांनी मोहिम राबविण्याची आवश्यकता आहे. नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामागपिक्षा सांगली कोल्हापूर रोडवर ही समस्या अधिक आहे.
दुसरीकडे नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर यापूर्वी अनेक अपघात होवूनही आजही अनेक वाहनचालक विरूध्द दिशेने आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून चुकीच्या पध्दतीने वाहने महामार्गावर आणतात. त्यामुळे समोरच्या वाहनचालकांचा गोंधळ होतो.
नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना अंकली फाट्याजवळ एका ट्रॅ क्टर चालकांने चुकीच्या पध्दतीने वनवेमध्ये टॅ क्टर चालविल्यामुळे अपघात होवून काहीजणांना प्राण गमवावे लागले होते. काही महिन्यापूर्वीच अंकली येथे कृष्णा नदीचा कठडा तोडून चारचाकी नदीजवळ खाली कोसळून सांगलीतील काहीजणांचे प्राण गेले होते. मागील काही वर्षात रस्ते मोठे होत आहेत. पण त्याबरोबरच अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे. याला वाहनचालकांचा बेफिकीरपणा आणि बेशिस्तपणाच अधिक जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. अंकली फाटा चौकात विजेची सोय चांगली आहे. पण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीसांनी वाहनांना शिस्त लावण्याबरोबरच येथे अपघातांची माहिती देणारे मोठ्या आकारातील फलक लावावेत, अशी वाहनचालकांतून मागणी करण्यात येत आहे.








