आमदार राजू सेठ यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मोतीवाला सोशल फौंडेशनचा’ उपक्रम
बेळगाव : निपाणी येथील सामाजिक कार्यकर्ते ए. एच. मोतीवाला यांनी बेळगावचे आमदार असिफ उर्फ राजू सेठ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंजुमन संस्थेला 67 हजार रुपयांची मदत केली. आमदार राजू सेठ यांचा 67 वा वाढदिवस असल्याने ही मदत देण्यात आली. 2020 मध्ये आलेल्या कोरोना महामारीमध्ये आमदार राजू सेठ यांनी अंजुमन संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणात रुग्ण सेवा केली होती. त्याचबरोबर आजतागायत त्यांनी हे व्रत जोपासले असून, मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य ते करत असतात. त्यांच्या सामाजिक कार्याला सहकार्य करण्याच्या हेतूने व आमदार राजू सेठ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ए. एच. मोतीवाला यांनी हा धनादेश आमदार राजू सेठ यांच्याकडे सुपूर्द केला.
राजू सेठ यांच्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त रक्कम सुपूर्द
2020 मध्ये अंजुमन संस्थेच्या माध्यमातून आमदार राजू सेठ यांनी केलेल्या कार्याने प्रभावित होऊन 2022 मध्ये सामाजिक कार्यकर्ते ए. एच. मोतीवाला यांनी ‘एक लाख रुपये’ अंजुमन संस्थेस दिले होते. त्यानंतर 2023 मध्येही मदत दिली होती. त्यानंतर आमदार राजू सेठ यांच्या 2024 मध्ये 66 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 66 हजार तर 67 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 2025 मध्ये 67 हजार रुपयांचा धनादेश आमदार राजू सेठ त्यांच्याकडे सुपूर्द केला. विशेष म्हणजे राजू सेठ यांच्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त ही रक्कम देतात.
राजू सेठ-मोतीवाला यांचे कौटुंबीक संबंध
आमदार राजू सेठ यांचे व ए. एच मोतीवालांचे कौटुंबीक संबंध आहेत. आमदार राजू सेठ हे नेहमीच मोतीवाला यांच्या सोबत राहिलेले आहेत. कोणतेही पद नसताना वैयक्तिक खर्चातून ए. एच. मोतीवाला हे प्रतिवर्षी करत असलेली मदत कौतुकास्पद आहे. मोतीवाला हे आमदार राजू सेठ यांच्या कार्याने प्रभावित झाल्यामुळेच ते प्रतिवर्षी मदतीचा धनादेश देत असतात. यावर्षी हा धनादेश देऊन त्यांनी मदतीचे सातत्य ठेवले आहे. ए. एच. मोतीवाला हे मोतीवाला सोशल फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत करत असतात.









