खानापूर : राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानासाठी खानापूर तालुक्याच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची तामिळनाडूच्या निवडणूक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांनी सोमवारी झालेल्या निवडणुकीसाठी चेन्नई येथील सत्यमूर्ती भवन येथे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच आपल्या मतदानाचा हक्कही त्यांनी बजावला.
सोमवारी मतदानानंतर मतपेटी घेऊन त्या दिल्लीकडे रवाना झाल्या. दिल्ली येथे 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. मी पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ती आहे. म्हणून काँग्रेसने माझ्यावर जबाबदारी दिली. भविष्यात काँग्रेस पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्यास मी सक्षम आहे, असे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.