कट्टा / वार्ताहर
मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठेतील रहिवाशी सौ अनिता अरविंद सामंत नेवाळकर वय 68 यांचे शनिवार सकाळी साडे अकराच्या सुमारास पडवे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. तिच्या पश्चात दोन मुलगे, पती आणि कुटुंबीय असा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे खजिनदार तसेच सिंधुदुर्ग जिल्हा कंजूमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूटर असोसिएशन या संस्थेचे जिल्हाध्यक्ष आणि कट्टा बाजारपेठेतील प्रतीथयश व्यापारी अरविंद नेवाळकर यांच्या त्या पत्नी होत. शनिवारी सायंकाळी कट्टा येथील स्थानिक स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.









