वृत्तसंस्था/ दोहा
डब्ल्यूटीए टूरवरील येथे झालेल्या कतार खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या अमंदा अॅनिसिमोव्हाने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना लॅटव्हियाच्या ओस्टापेंकोचा पराभव केला.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अॅनिसिमोव्हाने ओस्टापेंकोचा 6-4, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. या अंतिम सामन्यावेळी पावसाचा दोन वेळेला अडथळा आल्याने खेळ थांबवण्यात आला होता. 2002 साली मोनिका सेलेसने ही स्पर्धा जिंकल्यानंतर अॅनिसिमोव्हा सदर स्पर्धा जिंकणारी दुसरी अमेरिकन टेनिसपटू आहे. या जेतेपदामुळे अॅनिसिमोव्हाला महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादित पहिल्या 20 खेळाडूत स्थान मिळेल.









