वृत्तसंस्था/टोरँटो
डब्ल्युटीए टूरवरील सुरू असलेल्या नॅशनल बँक खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या अमंदा अॅनीसिमोव्हा एकेरीची अंतिम फेरी गाठताना आपल्या देशाच्या नेव्हारोचा पराभव केला.
उपांत्य फेरीच्या सामन्यात अॅनीसिमोव्हाने नेव्हारोवर 6-3, 2-6, 6-2 अशी मात केली. आता या स्पधेंत अॅनीसिमोव्हा आणि तृतिय मानांकीत व विद्यमान विजेती जेसिका पेगुला या दोन अमेरिकन टेनिसपटूंमध्ये जेतेपदासाठी लढत होईल. पेगुलाने उपांत्य फेरीच्या सामन्यात रशियाच्या डायना स्नेडरचा 6-4, 6-3 असा पराभव केला. या स्पर्धेवेळी वारंवार पावसाचा अडथळा निर्माण झाल्याने काही सामने उशीरा खेळविला गेले.









