वृत्तसंस्था/रियाध
डब्ल्यूटीए फायनल्स महिलांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेची 24 वर्षीय टेनिसपटू अमांदा अॅनिसिमोव्हाने पोलंडच्या द्वितीय मानांकीत इगा स्वायटेकला पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. अॅनिसिमोव्हाचा अलिकडच्या कालावधीतील स्वायटेकवरचा हा दुसरा विजय आहे. अॅलिसीमोव्हाने रियाधमधील या स्पर्धेत द्वितीय मानांकीन स्वायटेकचे आव्हान 6-7 (3-7), 6-4, 6-2 असे संपुष्टात आणत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. अॅनिसिमोव्हाने अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतही स्वायटेकला पराभूत केले होते. असून तिने राऊंडरॉबिन लढतीत अॅलेक्झांड्रोव्हावर 6-4, 6-4 असा विजय मिळविला. साबालेंकाची लढत विद्यमान विजेती कोको गॉफशी होईल.









