वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथील कर्नाटक राज्य लॉन टेनिस संघटनेच्या टेनिस कोर्टवर झालेल्या एटीपी टुरवरील बेंगळूर खुल्या 2023 च्या टेनिस स्पर्धेत भारताच्या अनिरुद्ध चंद्रशेखर आणि एन विजयसुंदर प्रशांत यांना दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
शनिवारी येथे झालेल्या पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरीयाचा चुंग आणि चीन तैपेईचा हेसू या जोडीने भारताच्या अनिरुद्ध चंद्रशेखर व एन विजयसुंदर प्रशांत यांचा 3-6, 7-6 (9-7), 11-9 अशा सेट्समध्ये पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. हा अंतिम सामना जवळपास 2 तास चालला होता. या स्पर्धेत पुरुष एकेरीत ऑस्ट्रेलियाच्या प्युरसेलने सर्बियाच्या मेजेडोनोव्हीकचा 6-2, 5-7 (7-9), 6-4 असा पराभव करत सलग दुसऱयांदा एटीपी चॅलेंजर स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थने ऑस्ट्रेलियाच्या मॅकेबीचा 6-3, 6-3 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले.









