आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा
बेळगाव : युनायटेड गोवन्स रिक्रेशन क्लब आयोजित युनायटेड गोवन्स आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत अनिलरुद्ध दत्तात्रय दासर तर मुलींच्या विभागात अर्पिता माडिवाल यांनी आपल्या गटात विजेतेपद पटकाविले. युनायटेड गोवन्सच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या बुद्धिबळ स्पर्धेत बेळगाव शहरातील विविध शाळांमधील 55 हून अधिक बुद्धिबळपटूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये मुलांच्या विभागात केंद्रीय विद्यालय क्रमांक 3 च्या अनिरुद्ध दत्तात्रय दासरीने साडेसहा गुणासह विजेते तर क्षतीज हिटंगी-बेनसन स्कूल याने साडेपाच गुणासह द्वितीय क्रमांक, माधव दत्तात्रय दासर साडेपाच गुणासह तिसरा क्रमांक, अथर्व कुमशीकर-केएलई याने साडेपाच गुणासह चौथा तर निशान पुजारी-शर्मन स्कूल याने पाच गुणासह पाचवा क्रमांक मिळविला.
मुलींच्या गटात सेंट झेवियर्सच्या अर्पिता मोडीवालने साडेतीन गुणासह प्रथम, वैष्णवी वाधीराज-केएलएसने 3 गुणासह दुसरा क्रमांक, दिव्या सत्तीगेरी-भरतेश 3 गुणासह तिसरा, वैभवी भट्ट-ज्ञानप्रबोधन अडीच गुणासह चौथा तर आदित्य चिखलवाले-केएलएसने 2 गुणासह पाचवा क्रमांक पटकाविला. स्पर्धेनंतर प्रमुख पाहुणे दिलीप चिंडक, युनायटेड क्लबचे अध्यक्ष शंतनु पुसाळकर, सचिव इग्नेस मस्कर्नेस, डॉ. जॉर्ज रॉड्रिग्ज, विलियम मिनीजीस, सुनील कल्याणपूरकर, सुधीरकुमार, स्टॅलॉन, बी. के. पाटील व व्यंकटेश आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना चषक, रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेचे प्रमुख आर्बिट म्हणून गिरीश बाचीकर, आकाश माडिवालर यांनी काम पाहिले.









