पुणे
आंबेठाण तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगर (ता. खेड) येथे वणव्यामुळे आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग डोंगराच्या उत्तर बाजूलाही पसरली. या आगीत अनेक जीवजंतू, पशुपक्ष्यांनी आपले प्राण गमावले आहेत. डोंगराला लागलेल्या आगीकडे या परिसरातील झाडांवरील पक्षी४ अगदी हताशपणे पाहत होते. वणवे हे सहसा मानवी हस्तक्षेपामुळे लागतात. परंतु अशा आगीत अगणित जीवांना, मुक्या जीवांना आपले प्राण गमवावे लागतात. या आगीमुळे परिसरातील पक्षांना पुढच्याकाळात अन्न आणि निवाऱ्यासाठी दुसऱीकडे जावे लागणार आहे.
Previous Articleश्रेयस पानोळकर स्काऊट गाईडच्या “राज्य पुरस्काराचा” मानकरी
Next Article चिपळूणचा पाणीपुरवठा हळूहळू पूर्वपदावर








