पेठ वडगाव/प्रतिनिधी
लम्पी स्कीन या पशुधनामध्ये पसरल्या जाणार्या आजारामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील जनावरांच्या शर्यती, बाजार आणि प्रदर्शनाला बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव बाजार समितीच्या जनावरांच्या बाजारासह जिल्ह्यातील सर्वच जनावर बाजार, शर्यती, प्रदर्शने बंद ठेवण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी या बाबतचे आदेश संबंधिताना दिले आहेत.
महाराष्ट्र राज्यातील जळगाव, अहमदनगर, अकोला, पुणे, धुळे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलढाणा, अमरावती, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत गायीच्या पशुधनामध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभुमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील जनावरांच्या शर्यती, बाजार आणि प्रदर्शनाला बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान याबाबत जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आदेश काढले आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गायींच्या रोगाचा धोका वाढला आहे. लम्पी स्कीनवर लवकर उपचार करण्यासाठी लसींचा पुरवठा केला जाणार आहे.
सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, औंध, पुणे यांचा कार्यशाळेत कोल्हापूर जिल्ह्यातील काही गायींचे नमुने तपासणी देण्यात आले होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील चौगुलेवाडी, मौजे अतिग्रे, तालुका हातकणंगले या गावांमधील जनावरांना लम्पी रोगाचा रोग प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहेत. प्राण्यांमधील सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये अधिसूचित केलेल्या रोगामध्ये लम्पी स्कीन या रोगाचा समावेश करण्यात आला आहे. याद्वारे जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी आदेश काढला आहे.
जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष ठेवण्याची गरज
लम्पी स्कीन प्रादुर्भाव आढळून आलेल्या ठिकाणी गोकुळ दुध संघ पशु अधिकारी व पशुसंवर्धन विभाग लक्ष ठेवून आहे. दरम्यान यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला असून अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी पशुधनावर आलेल्या संकटामुळे हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी यांनी परिस्थितीवर गांभीर्याने लक्ष ठेवण्याची गरज आहे.
शेती उत्त्पन्न जनावर बाजार समितीची लाखोंची उलाढाल ठप्प होणार ?
पेठ वडगाव बाजार समितीची विजया दशमी दसर्याच्या पार्श्वभूमीवर वडगावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात भरणाऱ्या जनावरे खरेदी विक्रीतून कोट्यावधीची उलाढाल होते. तर बाजार समितीस उत्पन होते. मात्र जनावरे बाजार बंदमुळे कोरोना काळात बाजार बंदमुळे अडचणीत असलेल्या बाजारसमित्या आणखी अडचणीत येणार आहेत. तर पशुधनावर आलेल्या संकटामुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची चिंता व्यक्त होत आहे.