राधानगरी/महेश तिरवडे
कोल्हापूर वन्यजीव विभाग व राधानगरी वन्यजीवच्या वतीने बुद्धपौर्णिमा निमित्ताने शुक्रवार दि 5 मे ते 6 पर्यत राधानगरी अभयारण्यात प्राणी गणना जंगलातील पाणवठ्यावर करण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी दिली आहे.
अभयारण्य क्षेत्रांतील प्राण्यांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी वन्यजीव विभागाच्या वतीने दरवर्षी बुध्दपोर्णिमा या दिवशी पाणवठ्यावर मचाण उभारून जनावरांची विष्ठा व ठशाचा अभ्यास करून प्राण्यांची गणना केली जाते. या गणने बरोबरच अभयारण्य क्षेत्रातील पाणवठ्यावर रात्रभर पहारा देऊन वनकर्मचारी , प्राणीमित्र, निसर्गमित्र पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांची माहिती नोंदवणार आहेत. यातून मिळालेल्या माहितीनुसार अभयारण्यातील वन्य प्राण्यांची सरासरी आकडेवारी जाहीर करण्यात येणार आहे.
त्यानुसार सर्व प्राणीमित्र, निसर्ग मित्र, सामाजिक संस्था आदी इच्छुकांनी www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन 30 एप्रिल पर्यत आपले नाव नोंदवावे असे आवाहन वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी केले आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









