Anil Patil NCP News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये अशी मागणी करत जितेंद्र आव्हाड आणि ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा दिला. यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.आज शरद पवार यांच्याशी भेट घेतल्यानंतर त्यांनी राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला. मात्र राजीनामा देऊ नका तुमच्या मनाप्रमाणे निर्णय घेण्याचा आम्ही विचार करत आहोत अस शरद पवार यांनी स्पष्ट केल्याचे अनिल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
आज सकाळपासूनच वाय. बी, सेंटरमध्ये अनेक नेते शरद पवार यांची भेट घेत आहेत. तसेच सकाळपासून बैठक सुरु आहे. मात्र जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड बैठकीपासून अनभिज्ञ असल्याचे बोलले जात आहे.आज सकाळपासूनच आव्हाड आणि पदाधिकाऱ्यांनी ठाण्यात आंदोलन सुरु केलं आहे. पवार साहेबांनी निर्णय मागे घ्यावे असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लावून धरला आहे. मात्र जयंत पाटील आणि आव्हाड या बैठकिला नसल्याने चर्चेला उधान आलं आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या फोननंतर जयंत पाटील आद मुंबईत येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले आज कोणतीच समितीची बैठक बोलावली नाही. शरद पवार यांना भेटण्यासाठी नेते आणि कार्यकत्यांची वाय. बी सेंटरमध्ये रीघ लागली आहे. मुंबई बाहेर गेलेले आहेत. ते आले की बैठक बोलवण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटलयं.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








