ऑनलाईन टीम / मुंबई :
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दाम्पत्याने मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करू, असा इशारा दिला होता. पण शिवसेनेला आव्हान देण्यासाठी रवी राणा खूपच लहान आहेत. त्यांची तेवढी औकातही नाही. हे दाम्पत्याने आजपर्यंत सुपाऱ्या घेऊनच काम केले आहे, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.
राणा दाम्पत्याने शुक्रवारी आम्ही मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करू, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर मोठी गर्दी केली. शिवसैनिक राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक झाले होते. यावेळी बोलताना अनिल परब म्हणाले, आम्ही शिवसैनिक आहोत. आम्हाला कोणीही आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये. रवी राणा आणि नवनीत राणा यांना राजकारणात स्वत:चे असे स्थान नाही. ते आजपर्यंत सुपाऱ्या घेऊनच काम करत आले आहेत. त्यांचा बोलवात धनी जे सांगतो, ते स्क्रिप्ट वाचण्याचे काम राणा दाम्पत्य करते.








