Anil Parab : अनिल परबांना टार्गेट केलं म्हणजे उध्दव ठाकरेंना टार्गेट केलं असं दाखवायचं. त्यांच्याजवळची माणस पक्ष बदलत नाहीत म्हणूनच दबाव टाकून पक्ष बदलण्यास भाग पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आज किरीट सोमय्यांनी नारायण राणेंपासून यशवंत जाधव पर्यंत ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्यांच्याविषयी सोमय्या कधीच बोलत नाहीत. आता या सर्वाची उत्तर किरीट सोमय्यांनी द्यावी असा इशारा शिवसेना नेते अनिल परब यांनी दिला आहे.
1960 पासून म्हाडाच्या बिल्डिंग तयार झाल्या. या बिल्डिंगमध्येच माझा जन्म झाला. जन्मापासून मी या इमारतीचा रहिवासी आहे. मी जेव्हा आमदार झालो तेव्हा मी दुसरीकडे राहायला गेलो. मात्र रहिवाशांच्या विनंतीवरून जनसंपर्क कार्यालय सोसायटीच्या इमारतीत ठेवलं. जागेबाबत म्हाडासोबत पत्रव्यवहार झाला होता. हायकोर्टाच्या सूचनेनुसार जागा नियमित करण्यासाठी 20 वर्षापूर्वी रहिवाशांनी अर्ज केला. जागा नियमित करण्यासाठी सोमय्यांनी दबाव टाकला. मात्र ही जागा नियमित करता येणार नसल्याचं कळल्यानं ती मोकळी केली होती. मात्र भाजपचा दबावतंत्र सुरु आहे. अशा वृत्तीमुळे म्हाडाच्या 56 वसाहतीमध्ये भिती निर्माण करण्याचे काम केले जात आहे. बिल्डरकडून सुपारी घेऊन केलेली ही सोमय्यांची खेळी असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहे. तसेच या खेळीला भाजपचा पाठिंबा आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.
कोर्टाने नारायण राणेंचं घर पाडण्याचा आदेश दिला आहे. त्यांच्या घराचं तोडकाम कुठवर आलंय ते पाहायला जाणार आहे. गरीबाच्या घरावर जर वरवंटा फिरणार असेल तर त्याच्यासाठी मी आणि शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा परबांनी दिला. किरीट सोमय्यांनी यावं त्यांच्य़ा स्वागताला इथे शिवसैनिक उभे आहेत, असे थेट आव्हान अनिल परब यांनी दिले.
दोन वर्ष माझ्य़ावर आरोप होत होते त्याचं उत्तर मी कधी किरीट सोमय्याला दिलं नाही. कारण त्याला मी जुमानत नाही. पण, आज म्हाडाच्या गरीब लोकांचा प्रश्न समोर आला आहे म्हणून मी रस्त्यावर उतरलो आहे. मी 56 वसाहतीत जाणार आहे त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. मात्र किरीट सोमय्याला आणि भाजपाला याचे उत्तर द्यावेच लागेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील भेटणार असून, गरीबाला उध्दवस्त करण्याचे तुमचे धारण आहे का? असे विचारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








