वृत्तसंस्था/ लखनौ
गेली तब्बल तीन दशके भारतीय टेनिस क्षेत्रामध्ये सातत्याने आपले वर्चस्व राखणारे अनिल खन्ना यांनी आपल्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अखिल भारतीय टेनिस संघटनेचे अनिल खन्ना हे एक उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
इ. स. 2000 साली अनिल खन्ना यांची अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या मानस सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये अनिल खन्ना यांचा गौरव करण्यात आला. या संघटनेमध्ये नवोदितांना संधी मिळावी यासाठी आपण वयाच्या 71 व्या वर्षी स्वखुशीने आपल्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे खन्ना यांनी म्हटले आहे. अनिल जैन हे सध्या अखिल भारतीय टेनिस संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.









