ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला असून, आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व धुळे-नंदुरबार प्रभारी पदाची जबाबदारी पक्षाने गोटे यांच्याकडे सोपविली होती. पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे गोटे यांची पक्षात घुसमट होत होती. एका जाहीर कार्यक्रमातही त्यांनी पक्षातील गटबाजीबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. याच गटबाजीला कंटाळून त्यांनी पक्षाला रामराम केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे गोटे यांनी राजीनामा दिला असून, पक्षाध्यक्ष शरद पवार यांना याबाबतची कल्पना दिली आहे, असे गोटे यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत सांगितले.








