Anil Deshmukh Bail : जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी आज कोर्टाने फेटाळली.सीबीआय मुदतवाढ देण्यास हायकोर्टाने नकार दिला. त्यामुळे अनिल देशमुखांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.उद्या आर्थर रोड कारागृहातून त्यांची सुटका होणार आहे. तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी अनिल देशमुख यांची तुरुंगातून सुटका होणार आहे.
अनिल देशमुखांना ईडीने अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून दोन गुन्ह्यांप्रकरणी अटकेत होते. मागील महिन्यात अनिल देशमुखांना ईडीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र सीबीआयच्या प्रकरणात देशमुखांना जामीन मिळणं बाकी होतं. त्यानंतर 12 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाने सीबीआयच्या प्रकरणातही अनिल देशमुखांना सशर्त जामीन मंजूर केला. परंतु त्याच दिवशी जामीनाला दहा दिवसांची स्थगिती देखील दिली. दरम्यान आज सीबीआय मुदतवाढ देण्यास हायकोर्टाने नकार दिला.
Previous ArticleSangli : सांगलीतील शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
Next Article Sangli : सागरेश्वर अभयारण्यातील दोन हरणांचा मृत्यू








