महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे एक वर्षाहून अधिक काळानंतर तुरुंगातून सूटका झाली. आज मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी आणि पक्षाच्या समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. केंद्रिय तपास संस्था सीबीआयने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपात 72 वर्षीय अनिल देशमुख मुख्य आरोपी होते.
अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी पक्षाचे दिग्गज नेते आर्थर रोड तुरुंगाबाहेर थांबले होते. त्यांनी सुटकेनंतर सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी आपल्या वरळीतील घराकडे प्रस्तान केले. या वेळी देशमुख यांना एका ओपन टॉप जीपमधून मिर्वणूक काढण्यात आली. पक्षाच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत होत्या.
पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, “सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून मला एक वर्षाहून अधिक काळ तुरुंगात ठेवण्यात आले. जो स्वत: दोन प्रकरणांमध्ये तुरुंगात असून त्याला यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे.” पुढे बोलताना ते म्हणाले, “कोणत्याही न केलेल्य़ा गुन्ह्यासाठी मला तुरुंगात टाकण्यात आले. पण शेवटी, मला कोर्टातून न्याय मिळाला. मला देशाच्या राज्यघटनेवर आणि प्रशासनावर विश्वास आहे. ” असेही म्हणाले.
माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे. माझ्यासह माझ्या पक्षाचा न्यायव्यवस्थेवर पुर्ण विश्वास आहे. तसेच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमचे सर्वोच्च नेते शरद पवार आणि पक्षाच्य़ा वरिष्ठ सहकाऱ्यांनी वेळोवेळी पाठींबा दिला आणि सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. तसेच न्यायमूर्तींनी आम्हाला न्याय दिला त्यासाठी मी त्यांचं मनःपूर्वक आभार मानतो.” अशी प्रतिक्रिया अनिल देशमुखांनी दिली आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








