Anil Deshmukh : सरकारनं जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत (MSP) शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यातून शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन कापसाच्या दरात वाढ करावी अशी मागणी, राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. कापसाच्या दरात घसरण झाल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. कापसाच्या दरात वाढ होण्याची शेतकरी प्रतिक्षा करत आहेत.त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 10 हजार रुपयांचा दर देण्याची मागणीच पत्र देशमुख यांनी लिहल आहे.
कापसाला सद्यस्थितीत शासनाने प्रति क्विंटल 6 हजार 380 असा दर निश्चित केला आहे. मात्र हा दर शेतकऱ्याला परवडणारा नाही. अतिवृष्टी, पूर, परतीचा पाऊस यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसतो. हाती आलेली शेतकऱ्यांची उभी पिकं उद्ध्वस्त झालेली आपण पाहिली असल्याचेही ते म्हणाले.
सध्या महाराष्ट्रासह पंजाबमध्ये कापसाच्या दरात सातत्यानं घसरण होत आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळं काही शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता कापूस घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








