मुंबई / ऑनलाईन टीम
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाकडून सुरु असलेल्या कारवाईवरुन विविध राजकीय नेत्यांच्या प्रितिक्रिया समोर येत आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. वैफल्यातून चौकशीचा ससेमिरा लावला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत माध्यमांशी बोलतातन म्हणाले की, हा दबावाचा प्रश्न नाही, तर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. प्रताप सरनाईक यांच्या पत्रात विनाकारण त्रास दिला जात आहे याचा उल्लेख असल्याचं मी वारंवार सांगत आहे. या तक्रारींचा तपास या राज्याचे पोलीस, तपास यंत्रणा निष्पक्षपणे करु शकतात, न्यायालयं आहेत. तरीदेखील मागच्या दाराने केंद्रीय तपास यंत्रणा आणल्या जात असतील तर शरद पवार म्हणतात ते बरोबर आहे की सत्ता गेल्यामुळे निराशा आणि वैफल्यातून अशा चौकशांचा ससेमिरा मागे लावला जात आहे.
सत्ताधारी पक्षातल्या प्रमुख नेत्यांवर ठरवून कार्यवाही केली जाते. केंद्रीय पथके येथे येतात आणि कोणाच्या दबावाखाली येथे येऊन कार्यवाही करतात हे संघराज्य पद्धतीला हानीकारक असल्याचे देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








