पुणे \ ऑनलाईन टीम
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) छापा टाकण्यात आला आहे. ईडीच्या छापेमारीनंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या छापेमारीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ईडी वगैरे आम्हाला काही नवीन नाहीत. अनिल देशमुख काही पहिले नाहीत. अनेकदा सत्तेचा या पद्धतीने वापर करण्याचा पायंडा आत्ताच्या राज्यकर्त्यांनी दाखवला आहे. त्याची आम्हाला यत्किंचितही चिंता वाटत नाही, असे शरद पवार यावेळी म्हणाले.
पुण्यामध्ये आज शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चा नव्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी शरद पवार म्हणाले की, ईडी वगैरे आम्हाला काही नवीन नाहीत. अनिल देशमुख काही पहिले नाहीत. अनेकदा सत्तेचा या पद्धतीने वापर करण्याचा पायंडा आत्ताच्या राज्यकर्त्यांनी दाखवला आहे. अनिल देशमुखांवर केंद्र सरकारच्या काही यंत्रणांनी याआधीही कारवाई केली होती. पण त्यातून त्यांना काय हाती लागलं हे मला माहिती नाही. माझ्यामते काहीही हाती लागलं नाही. त्या नैराश्यातूनच अजून कुठून त्रास देता येईल का? या विचारातून हा त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे. त्याची चिंता करण्याचं आम्हाला काही कारण नाही. जो विचार आपल्याला मान्य नाही तो विचार दडपण्याचा प्रयत्न या प्रकारच्या यंत्रणा वापरून केला जातो. हे काही नवीन नाही. अनेक राज्यांमध्ये देखील आणि महाराष्ट्रात देखील यापूर्वी आपण कधी हे पाहिलं नव्हतं. केंद्राची सत्ता यांच्या हातात आल्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी पाहायला लागलो. मला वाटतं याचा काही परिणाम होणार नाही. लोक देखील त्याची गांभीर्याने नोंद घेत नाही, असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले.
दिल्लीतील विविध पक्षांच्या, संघटनांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीबाबत बोलताना पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या आंदोलनासंबंधी विविध पक्षांची बैठक घेतली. राजकीय अभिनिवेश न बाळगता संसदेत आपली भूमिका मांडण्यासाठी ही बैठक होती. त्यात दिल्लीत सहा महिन्यांहून अधिक काळ रस्त्यावर जे शेतकरी राजकीय पक्षाला वगळून आंदोलन करत आहे.मात्र त्याकडे केंद्र सरकारकडून त्याची आतापर्यंत दखल घेतलेली नाही. पण एका महत्वाच्या प्रश्नाला समर्थन कसे देता येईल यावर बैठक होती. संसदेचे काम सुरू झाल्यावर तिथे हा विषय कसा मांडता येईल यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








