आळसंद/वार्ताहर
ते शिंदे गटाचे नाहीत. भाजपमध्ये आहेत की नाहीत ते बघावे लागेल. असतील तर भाजपने ठरवावे. राजकारणात आम्ही कोणतेही पथ्य मोडत नाही. आम्ही पण त्यांना मदत केली आहे. भाजप सत्तेवर जाण्यासाठीसुद्धा मदत केली आहे, अशी टिका आमदार अनिल बाबर यांनी खासदार संजय पाटील यांच्यावर नाव न घेता केली. खानापूर तालुक्यातील खंबाळे (भा) शेतकरी व जवान यांच्या पुतळ्याच्या उदघाटना नंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी रवींद्र निकम, विजय सुर्वे ,उपसरपंच अमोल सुर्वे उपस्थित होते.
टेंभू योजनेच्या श्रेयवादावरून खासदार संजय पाटील व आमदार अनिल बाबर यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले आहे. परवाच हिंगणगादे येथे खासदार संजय पाटील यांनी आमदार बाबर यांच्यावर टिका केली. त्यावर बोलताना आमदार बाबर यांनीही शेतकऱ्यांसाठी कितीही वेळा संघर्ष करावा लागला तरी चालेल मी तयार असल्याचे सांगितले.
आमदार बाबर म्हणाले, मी माझे काम करत राहीन. मी राजकारणात आल्यापासून संघर्ष करत आलो आहे. काम करत असताना काय प्रसंग येतील? त्याला मी सामोर जाण्यास तयार आहे. राजकारणात आम्ही कोणतेही पथ्य मोडत नाही. आम्ही पण त्यांना मदत केली आहे. भाजप सत्तेवर जाण्यासाठी सुद्धा मदत केली आहे. त्याची त्यांना आठवण असो वा नसो. कुणाच्या रक्तात किती संघर्ष आहे म्हणण्यापेक्षा आमच्या रक्तात जन्मताच त्यांच्या पेक्षा संघर्ष जास्त आहे. कुणाला काय म्हणायचे ते म्हणू द्या. त्यांनी मागील प्रसंगाच्या आठवणी ठेवाव्यात. मी पण ठेवाव्यात, असे आमदार बाबर म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









