वृत्तसंस्था/टोरँटो (कॅनडा)
येथे सुरू असलेल्या कॅनेडियन खुल्या आंतरराष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेत भारताची स्क्वॅशपटू अनहात सिंगचे आव्हान उपांत्य फेरीतच समाप्त झाले. इंग्लंडच्या गिना केनेडीने तिचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. 96250 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रक्कमेच्या पीएसए सिल्व्हर कॅनेडियन खुल्या स्क्वॅश स्पर्धेतील उपांत्य सामन्यात 10 व्या मानांकीत गिना केनेडीने अनहात सिंगचा 11-5, 11-8, 12-10 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत अनाहतने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या मेलीसा अल्व्हेसला पराभवाचा धक्का दिला होता.









