रत्नागिरी :
तालुक्यातील निवळी–जयगड रस्त्यावरील चाफे येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल़ा ही घटना मंगळवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडल़ी किरण कृष्णा पागडे (42, ऱा चाफेरी रत्नागिरी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आह़े अपघातानंतर ट्रकचालकाने जागीच न थांबता अपघातग्रस्त दुचाकीला 1 किलोमीटरपर्यंत फरफटत नेल़े यामुळे संतप्त झालेल्या जमावाने ट्रक पेटवून दिल़ा सुदैवाने पोलिसांनी वेळीच पोहचून संतप्त ग्रामस्थांना शांत केल़े
किरण पागडे हा मंगळवारी सकाळी आपल्या ताब्यातील दुचाकी घेवून चाफे ते जाकादेवी असा जात होत़ा सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास चाफे येथे समोऊन येणाऱ्या सहा चाकी ट्रकने (एमएच 40 बीएल 9998) किरण याच्या ताब्यातील दुचाकीला जोराची धडक दिल़ी या धडकेत किरण याचा जागीच मृत्यू झाल़ा अपघात झाल्यानंतर त्याठिकाणी असलेल्या ग्रामस्थांनी आरडाओरडा केल़ा यावेळी ट्रकने दुचाकीला सुमारे 1 किलोमीटरपर्यंत फरफटत नेल़े त्यानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून धूम ठोकल़ी संघर्ष सुशांत आंबागडे (24, ऱा नागपूर) असे ट्रकचालकाचे नाव आह़े संघर्ष हा ट्रक जयगड बंदराच्या दिशेने घेऊन जात होता अशी माहिती समोर येत आह़े
- संतप्त जमावाने ट्रक पेटवला
अपघाताची माहिती काही क्षणातच पंचक्रोशीत पसरताच मोठ्या प्रमाणात लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीस्वाराचा मृतदेह रस्त्यावर पडलेला पाहून उपस्थित जमावाच्या संतापाचा पारा चढल़ा यावेळी जमावाने ट्रकला आपला निशाणा बनवत ट्रक पेटवून दिला. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ट्रक जळत असताना धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांनी परिस्थिती आणखी गंभीर बनली. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु ग्रामस्थांच्या संतापाचा पारा काही कमी होत नव्हता.
- अवजड वाहनांची वाहतूक ग्रामस्थांनी रोखली
या अपघाताने जयगड–निवळी मार्गावरील अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून अवजड वाहनांची वाहतूक रोखून धरल़ी रस्त्याची दुरवस्था आणि कंपन्यांकडे जाणाऱ्या अवजड वाहनांच्या बेदरकार वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला आहे. गावातून जाणाऱ्या या वाहनांमुळे आमचा जीव धोक्यात आल्याच्या संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांनी लावून धरली आहे.
- अपघात संदर्भात पोलिसांचा तपास सुरू
अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. ट्रकचालकाविऊद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, जळालेल्या ट्रकमुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, परंतु पोलिसांनी परिस्थिती हाताळून वाहतूक सुरळीत केली.
- किरण पागडे याच्या मृत्यूने परिसरात शोककळा
किरण पागडे याचा अपघातात मृत्यू झाल्याने चाफेरी गावावर शोककळा पसरली. किरण हा चारचाकी गाड्यांवर चालक म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत़े त्याच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आह़े एका होतकऊ तऊणाचा अपघाती मृत्यू झाल्याने स्थानिकांनी प्रशासनाकडे रस्त्याच्या दुऊस्तीसह अवजड वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे.








