बेळगाव : शीतल हॉटेल जवळील थळाच्या मंदिरजवळ अनेक जण कचरा फेकत आहेत. तो कचरा काढण्याकडे महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकांना घेराव घालण्यात आला. यावेळी त्यांना या परिसरातील स्वच्छता करावी, असे सांगण्यात आले. महानगरपालिकेचेच काही कर्मचारी या ठिकाणी कचरा टाकत असल्याची तक्रार नामदेव दैवकी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र यापुढे असे घडणार आहे, असे सांगत या परिसरातील कचरा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. खडेबाजारमधून मध्यवर्ती बस स्थानकाला जाणाऱ्या या मुख्य रस्त्यावरील शीतल हॉटेलशेजारी थळाचे मंदिर आहे. त्या ठिकाणी उंदिर तसेच घुशींनी हैदोस घातला आहे. याचबरोबर काहीजण त्याच परिसरात कचरा फेकत आहेत. त्यामुळे कचरा मोठ्या प्रमाणात साचून आहे. याकडे मनपाने दुर्लक्ष् केल्याने नागरिकांनी शनिवारी अधिकाऱ्यांना जाब विचारला. नामदेव दैवकी समाजाचे अध्यक्ष अजित कोकणे, प्रवीण कणेरी, हेमंत हावळ, अशोक रेळेकर, महेश खटावकर, उज्ज्वल बोंगाळे, माजी नगरसेवक देवेंद्र हावळ, साजिद मिर्जा यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Next Article बेळगुंदी फाट्यानजीक दोन कारगाड्यांचा भीषण अपघात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









