स्टिचेस नावाच्या चित्रपटात मुख्य भूमिका
अँजेलिना जोली ही एलिस विनोकॉर दिग्दर्शित चित्रपटात अभिनय करण्यासाठी पॅरिसमध्ये दाखल झाली आहे. ती पाब्लो लारेन यांच्या ‘मारिया’ प्रसिद्ध ओपेरा गायिका मारिया कैलासची भूमिका साकारल्यावर आता पुन्हा एकदा स्वत:च्या अभिनयाची जादू दाखवून देणार आहे. ‘स्टिचेस’ नावाचा हा चित्रपट हाय फॅशनच्या जगावर बेतलेला आहे. जोली चित्रपटात एका फिल्म निर्मात्याची भूमिका साकारणार आहे. तीन महिलांचे आयुष्य फॅशन वीकदरम्यान परस्परांशी भिडत असल्याचे यात दाखविले जाणार आहे.

या चित्रपटाचे चित्रिकरण जानेवारीत सुरू होणार आहे. चार्ल्स गिलिबर्ट यांच्या पॅरिस येथील बॅनर सीजी सिनेमा झांग शिन आणि क्लोजर मीडियायच विलियम हॉरबर्ग यांच्यासोबत मिळून याची निर्मिती करत आहेत. पाथे फिल्म्स फ्रान्समध्ये या चित्रपटाचे वितरण करणार आहे. हा चित्रपट विनोकॉर यांचा मागील चित्रपट प्रॉक्सिमा प्रमाणेच इंग्रजी अणि फ्रेंच भाषेत तयार केला जाणार आहे. या चित्रपटात इवा ग्रीनने एका अंतराळवीराची भूमिका साकारली होती.
अँजेलिना यापूर्वी मारिया चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी पॅरिस येथे आली होती. हा चित्रपट 1970 च्या दशकातील प्रसिद्ध ग्रीक ओपेरा गायिकावर आधारित होता. या चित्रपटातील अभिनयासाठी अँजेलिनाचे कौतुक झाले होते.









