प्रतिनिधी/ बेळगाव
आयटक प्रणित अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्स फेडरेशनच्यावतीने 10 डिसेंबर रोजी सुवर्ण विधानसौधजवळ धडक मोर्चा काढला जाणार आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने पाच हजारहून अधिक कार्यकर्त्या या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.
निवृत्ती वेतन तसेच इतर मागण्यांसाठी आंदोलन केले जाणार आहे. यावेळी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अॅड. नागेश सातेरी यांनी केले आहे.









