साखळी उपोषणाचा 16वा दिवस
प्रतिनिधी /पणजी
सेवेतून कमी केलेल्या सात अंगणवाडी सेविकांना परत सेवेत घ्यावे या मागणीसाठी गेल्या 16 दिवसांपासून येथील आझाद मैदानावर साखळी उपोषण करणाऱया सेविकांपैकी काल पोर्णिमा गावकर या सेविकेची प्रकृती खालावली आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका येऊन तिच्यावर तात्पूरता उपचार करण्यात आला. गेले दोन दिवस उपोषण आणि रात्रीच्यावेळी भितीने झोप येत नाही, शिवाय पाऊस याचा तिच्यावर परीणाम झाला असून तिची तब्यत बिघडली अशी माहिती उपोषणाला बसलेल्या एका सेविकेने दिली आहे.
सरकार आमचा अंत पाहत आहे. आमची कोणतीही चुक नसताना आम्हाला सेवेतून कमी करण्यात आले. वास्तवीक दिड हजार सेवीकांनी आपल्या रास्त मागण्यासाठी संप केला होता. सरकारने त्या मागण्याही मान्य केल्या. आम्हा सात सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले. आमच्यावरच हा अन्याय कशासाठी असा प्रश्न उपोषणकर्त्या सेविकांनी उपस्थित केला आहे. आम्हाला त्वरीत सेवेत घ्या अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे.
गेल्या सोळा दिवसांपासून आम्ही साखळी उपोषणाला सुरुवात केली असताना आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते मात्र आमच्याकडे कुणी लक्ष दिले नाही. शाळा सुरु झाल्याने आमच्या मुलांकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ मिळत नाही. मुलांना शाळेत सोडणे तसेच त्यांना परत आणण्याच्या अडचणी निमार्ण झाल्या आहेत. घरी व्यवस्थिती लक्षद्यायला मिळत नसल्याने घरी कौटुंबिक तणाव निर्माण झाला आहे. एकाबाजूने घरच्या लोकांना तोंड द्यावे लागते तर दुसऱय़ा बाजूने आमच्या हक्कासाठी आझादमैदानावर संप करावा लागत आहे.
आम्ही संपाला बसल्या पासून आझादमैदानावर आम्हाला विचित्र अनुभव येत आहेत त्यांनाही आम्ही खंबीरपणाने सामोरे जात आहोत. रात्रीच्यावेळी चित्रविचित्र लोक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे आझादमैदानावर झोपणे कठीण बनले आहे. आम्ही उपोषणाला बसणार याची माहिती पोलासंना दिली होती मात्र रात्रीच्यावेळी एकही पोलीस या ठिकाणी नसतो. अशा स्थितीत आम्हाला या ठिकाणी दिवस काढावे लागतात. महिला झोपलेल्या असतानाही काही माणूमस मुद्दामहून रात्रीच्यावेळी येत असतात. आमच्या मनात भिती निर्माण करून आम्ही उपोषण मागे घ्यावे या हेतूने हे सारे प्रकार केले जात आहेत की काय असा संशय आम्हाला येत आहे. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असून जोपर्यंत आम्हाला सरकार सेवेत घेत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असेही सेविकांनी सांगितले.









