Satara News: एक रकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज (सोमवारी) साखर संकुल पुणे येथे राज्यव्यापी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. दोन तुकड्यातील एफआरपीचा केलेला कायदा रद्द करून पुन्हा एकरकमी एफआरपी करा, या प्रमुख मागणीसाठी व अन्य मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय सोडणार नाही, अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty)यांनी नुकताच दिला आहे.यासाठी हजारो शेतकरी आज जमणार आहेत. दरम्यान आनेवाडी टोल नाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाड्या सोडण्यास नकार दिल्याने ठिय्या मांडला आहे.
नेमके काय घडले
राज्यव्यापी धडक मोर्चात सहभागी होण्यासाठी साताऱ्य़ातील शेतकरी पुण्याकडे जात असताना आनेवाडी टोल नाक्यावर शेतकऱ्यांच्या गाड्या अडवण्यात आल्या. टोल भरा मगच गाडी सोडणार असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी टोल नाके बंद पाडले. एकनाथ शिंदेच्या मेळाव्यास जाताना टोल माफ केला जातो मग शेतकऱ्यांच्या मेळाव्याला जाताना टोल माफ का केला जात नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यामुळे काहीकाळ आनेवाडी टोल नाक्यावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा- आनेवाडी टोल नाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या
Previous Articleओबीसी, एसटी, एसीचा लाक्षणिक धरणे आंदोलन
Next Article कारभाऱ्यांचे प्रभाग चकचकीत, बाकींच्याचे ‘भकास’









