वृत्तसंस्था/ नॉटींगहॅम
येथे सुरु असलेल्या एटीपी चॅलेंजर टूरवरील ग्रासकोर्टवरील टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या माजी टॉप सिडेड अँडी मरेने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. अलिकडच्या कालावधीत मरेचे एटीपी चॅलेंजर टूरवरील स्पर्धेतील हे सलग दुसरे जेतेपद आहे. मरे आता पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या विंबल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे.
रविवारी येथे झालेल्या नॉटीगहॅम खुल्या ग्रासकोर्ट पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीच्या अंतिम सामन्यात अँडी मरेने फ्रान्सच्या आर्थर केझॉक्सचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. आता तो पुढील आठवड्यात होणाऱ्या क्विन्स क्लब ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत सहभागी होत आहे. अँडी मरेने आतापर्यंत 3 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या असून त्यापैकी दोन वेळा विंबल्डन स्पर्धा जिंकली आहे. 2023 ची विंबल्डन स्पर्धा 3 जुलैपासून लंडनमध्ये खेळविली जाईल.









