प्रतिनिधी
बांदा
डेगवे येथील श्री देवी महालक्ष्मी स्थापेश्वर भजन मंडळ आयोजित भजन स्पर्धेत आंदुर्ले येथील श्री विठ्ठल रखुमाई भजन मंडळाने प्रथम क्रमांक मिळविला. नेरूरचे मोरेश्वर मंडळ द्वितीय तर ओटवणे रवळनाथ मंडळ तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. भजन स्पर्धेला पंचक्रोशीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक आनंद गवस यांच्या हस्ते दीपप्रज्वलाने करण्यात आले. यावेळी भाजपा तालुका चिटणीस मधुकर देसाई, सरपंच राजन देसाई, उपसरपंच मंगेश देसाई, तांबुळी माजी सरपंच अभिलाष देसाई, उद्योजिका सौ. अक्षता गवस, मधुकर उमाजी देसाई, सिताराम देसाई, दत्तप्रसाद स्वार, परीक्षक भालचंद्र केळुस्कर, सौ. वीणा दळवी, प्रेमानंद देसाई, विलास देसाई, भरत देसाई, राजेश देसाई, विठ्ठल देसाई, राजेंद्र देसाई, उमाजी देसाई उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
प्रथम श्री विठ्ठल रखुमाई भजन मंडळ आंदुर्ले (बुवा अमोल होडावडेकर), द्वितीय मोरेश्वर भजन मंडळ नेरुर (बुवा भगवंत गावडे), तृतीय रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ ओटवणे (बुवा आत्माराम कवठणकर),उत्तेजनार्थ मुसळेश्वर भजन मंडळ मळेवाड (बुवा राकेश नाईक), ब्राम्हणदेव महिला भजन मंडळ, पावशी (बुवा प्रियांका तवटे),स्वरधारा भजन मंडळ डेगवे (बुवा सखाराम देसाई).
वैयक्तिक पारितोषिके: उत्कृष्ट गायक अथर्व होडावडेकर (आंदुर्ले), हार्मोनियम हेमंत तवटे (पावशी), पखवाज अथर्व नेरुरकर (नेरुर), तबला प्राजक्ता परब (ओटवणे), झांज गौरेश नाईक (मळेवाड), कोरस विठ्ठल रखुमाई भजन मंडळ आंदुर्ले,उत्कृष्ट स्थापेश्वर गजर रवळनाथ भजन मंडळ, ओटवणे, उत्कृष्ट बाल कलाकार स्वयंम नाईक (मळेवाड).
स्पर्धेचे परीक्षण भालचंद्र केळुसकर आणि सौ. वीणा दळवी यांनी केले. स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी झाले होते. डेगवे ग्रामस्थांनी या स्पर्धेचे नीटनेटके आयोजन केले होते.









