वृत्तसंस्था/ बॅस्टेड (स्वीडन)
एटीपी टूरवरील रविवारी येथे झालेल्या नोर्डा खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या द्वितीय मानांकित आंद्रे रुबलेव्हने एकेरीचे जेतेपद मिळविताना नॉर्वेचा टॉप सिडेड कास्पर रुडचा पराभव केला.
रुबलेव्ह आणि रुड यांच्यात सुमारे दीड तास चाललेल्या अंतिम सामन्यात रुबलेव्हने रुडचा 7-6 (7-3, 6-0) असा पराभव केला. एटीपीच्या ताज्या क्रमवारीत रुबलेव्ह सध्या चौथ्या स्थानावर आहे. यापूर्वी रुबलेव्हने माँटेकार्लो मास्टर्स 1000 दर्जाची टेनिस स्पर्धा जिंकली होती. रुबलेव्हने आतापर्यंत एटीपी टूरवरील 14 स्पर्धा जिंकल्या आहेत.









