वृत्तसंस्था/ ऑकलंड
न्यूझीलंडचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आंद्रे अॅडॅम्स पाकविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघाचा सहायक स्टाफमध्ये सामील झाला आहे. ही मालिका 12 जानेवारीपासून सुरू होत आहे.
पाच सामन्यांच्या या मालिकेत अॅडॅम्स गोलंदाज प्रशिक्षक म्हणून काम पाहणार असून मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांच्या कोचिंग स्टाफमधील ते सदस्य असतील. या स्टाफमध्ये फलंदाज प्रशिक्षक ल्युक राँची यांचाही समावेश आहे. अॅडॅम्स हे वेगवान गोलंदाज प्रशिक्षक म्हणून प्रामुख्याने काम पाहणार आहेत.









