वृत्तसंस्था/ ऑकलंड
न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू आंद्रे अॅडॅम्सची आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्य प्रशिक्षक बेन सॉयर यांच्यासमवेत ते काम पाहणार आहेत. या दौऱ्यात न्यूझीलंड व द.आफ्रिका महिला संघांत एकूण आठ मर्यादित षटकांचे सामने होणार आहेत. त्यापैकी 3 वनडे व पाच टी-20 सामने होणार आहेत. अॅडॅम्सने न्यूझीलंडचे 47 सामन्यात प्रतिनिधित्व केले असून 2003 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याने 10 बळी मिळविले होते. अॅडॅम्स व सॉयर यांनी याआधीही फ्रँचायजी लीगमध्ये एकत्र काम केले आहे.









