वृत्तसंस्था/ मुंबई
2024 च्या रणजी क्रिकेट हंगामातील इलाईट ब गटातील सामन्यात मुंबई विरुद्ध खेळताना आंध्रप्रदेशचा संघ रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर पराभवाच्या छायेत वावरत आहे. आंध्रप्रदेशचा संघ 47 धावांनी पिछाडीवर असून त्यांना मुंबईकडून फॉलोऑन स्वीकारावा लागला.
या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात 395 धावा जमवल्या. मुंबईच्या डावामध्ये लालवानी, कोटीयान आणि अवस्थी यांनी अर्धशतके झळकवली. अय्यरने 48 तर पार्करने 41 धावा केल्या. त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी आंध्रला पहिला डावात 184 धावात गुंडाळले. आंधप्रदेशच्या डावात प्रशांत कुमारने 10 चौकारासह 73 तर ज्ञानेश्वरने 23, भुईने 20, गिरीनाथने 34 धावा जमवल्या. मुंबईचा मुलानी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला त्याने 65 धावात 6, धवल कुलकर्णीने 3 गडी बाद केले. मुंबईने पहिल्या डावात 211 धावांची आघाडी मिळविल्याने त्यांनी आंध्रप्रदेशला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला.
आंधप्रदेशला दुसऱ्या डावातही मुंबईच्या गोलंदाजीसमोर फलंदाज झटपट गमवावे लागले. दिवसअखेर आंध्रने 51 षटकात 5 बाद 164 धावापर्यंत मजल मारली. आंध्रच्या दुसऱ्या डावात शेख रशीद एकाकी लढत देत 1 षटकार आणि 6 चौकारासह 52 धावावर खेळत आहेत. हनुमा विहारीने 6 चौकारांसह 46, कर्णधार भुईने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 28 धावा केल्या. नितीशकुमार रे•ाr 1 षटकार आणि 2 चौकारांसह 22धावावर खेळत आहे. आंध्रच्या दुसऱ्या डावातही पुन्हा मुलानी प्रभावी ठरला. त्याने 63 धावात 3 तर अवस्थी आणि डायस यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक : मुंबई प. डाव 395, आंधप्रदेश प. डाव सर्वबाद 184, आंध्रप्रदेश दु. डाव 5 बाद 164).









