Andheri East Bypoll : आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा सामना होणार होता. मात्र शिंदे गटाची ही जागा आता भाजपने आपल्याकडे घेऊन पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (Murji Patel News)
भाजपने मुरजी पटेल यांना या मतदारसंघांमधून उमेदवारी दिल्याचं कळतं.शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला. शिंदे गट या विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवार उभा करणार होता. परंतु आता शिंदे गटाची ही जागा भाजपने आपल्याकडे घेत मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आता शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.
दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने रमेश लटके यांचं निधन
शिवसेनेचा अंधेरी भागातला एक विश्वासू चेहरा अशी ओळख असणारे आमदार रमेश लटके यांचे बुधवारी (ता. ११ मे २०२२) संध्याकाळी दुबईत हृदयविकाराने निधन झालं. ते दुबईला आपल्या कुटुंबासह फिरायला गेले होते. परंतु तिथेच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं. वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २१ एप्रिल रोजी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता. ते मूळचे कोल्हापुरातील शाहूवाडीचे होते.
कोण आहेत मुरजी पटेल?
-मुरजी पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत.
-२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुरजी पटेल हे रमेश लटके यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
-राज्यात २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युती जाहीर झाली होती. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभेची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला गेली होती.त्यामुळे मुरजी पटेल यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








