And.Narayan alias Shyam Godkar as President of Vengurle Bhandari Samaj Eikyavarkadha Mandal
भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्लेच्या तीन वर्षासाठी संचालक मंडळाच्या झालेल्या निवडीत अध्यक्षपदी अँड. नारायण उर्फ श्याम गोडकर यांची उपाध्यक्षपदी वृंदा कांबळी व रमण वायंगणकर यांची सरचिटणीसपदी प्रा. आनंद बांदेकर यांची तर खजिनदार विकास वैद्य पदी एकमताने निवड करण्यातं आली.
वेंगुर्ले हॉस्पीटल नाका येथील स्वामी समर्थ कॉम्पलेक्स मधील मंडळाच्या कार्यालयात संचालक मंडळाची सभा भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाचे सचिव विकास वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यामध्ये मंडळाच्या अध्यक्षपदी अँड. नारायण उर्फ श्याम जनार्दन गोडकर यांची पुढील तीन वर्षाच्या कालावधीकरीता एकमताने निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिका सौ. वृंदा कांबळी व रमण वायंगणकर, सरचिटणीसपदी डॉ. प्रा. आनंद बांदेकर, खजिनदारपदी विकास वैद्य, सहचिटणीसपदी दिपक कोचरेकर, यांची एकमताने निवड करण्यात आली.
वेंगुर्ले (वार्ताहर)-









