दक्षिण इटलीच्या कंपानियांनजीक पॉज्जुओली बंदरावर पुरातत्वतज्ञांना शोधमोहिमेदरम्यान एका प्राचीन मंदिराचे अवशेष मिळाले आहेत. प्राचीन मंदिराचे अवशेष पाहून पुरातत्व तज्ञ दंग झाले आहेत. हे अवशेष नबातियन संस्कृतीशी निगडित मंदिराचे असल्याचे सांगण्यात येत आहे. हे मंदिर नबातियन देवता दसहराला समर्पित आहे. नबातियन संस्कृतीमध्ये दसहराला पर्वतांची देवता देखील म्हटले जाते. मंदिराच्या अवशेषांसोबत संशोधकांना दोन प्राचीन रोमन मार्बल देखील आढळून आले असून ते अत्यंत सुंदर आहेत.
नबातियन हे रोमन साम्राज्याशी मैत्रीसंबंध राखून होते. रोमन काळात नबातियन साम्राज्य फरात नदीपासून लाल समुद्रापर्यंत फैलावलेले होते. अरेबियन वाळवंटी भागात पेट्रा हे ठिकाण त्या काळात नबातियन साम्राज्याची राजधानी होते. नबातियन समाज्य पॉज्जुओली बंदरापर्यंत फैलावलेले होते, जे रोमन भूमध्य समुद्रातील सर्वात मोठे व्यापारी बंदर देखील होते.

18 व्या शतकाच्या मध्यात प्राचीन पॉज्जुओलीच्या हिस्स्यादाखल नबातियन देवता दसहराशी निगडित एक शोधाने तेथे कधीकाळी नबातियन साम्राज्य हेत हे स्पशट केले हाते. कारण प्राचीन काळात केवळ नबातियन समुदायाचे लोकच या देवतेची पूजा करायचे.
संशोधन सुरूच
मंदिराचे अवशेष मिळाल्यावर पुढील संशोधन हाती घेण्यात आले आहे. मंदिरावरून आणखी अधिक माहिती जमविली जात आहे. यातून इटलीच्या या प्राचीन शहराच्या इतिहासाचे आणखी काही पदर उलगडले जाऊ शकतात. इटलीच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी शोधाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. प्राचीन पॉज्जुओली येथे आणखी एक खजिना मिळाला असून तो येथील सांस्कृतिक, धामिंक आणि व्यावसायिक महत्त्व दर्शवित असल्याचे सांस्कृतिक मंत्र्यांनी म्हटले आहे.
ज्वालामुखीय क्षेत्र
पॉज्जुओलीला पुतिओली या नावानेही ओळखले जात होते. हे ठिकाण काम्पानियां येथून निर्यातीसाठीचे मुख्य केंद्र होते. नबातियन समुदायाने पुतिओलीला स्वतःचा तळ करत स्वतःच्या संरक्षक देवतेला समर्पित एक मंदिर बांधले होते. हा भाग एका सक्रीय ज्वालामुखीय क्षेत्राच्या नजीक आहे. या ज्वालामुखीमुळेच पुतिओलीचा एक हिस्सा जलमग्न झाल्याचे मानले जाते.









