फिल्मी शैलीत घडला प्रकार
नेदरलँडच्या एसेन शहरातील ड्रेंट्स म्युझियममधून एक हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे. ऐतिहासिक ड्रेंट्स म्युझियममधून शेकडो वर्षे जुन्या मूल्यवान सामग्रींची चोरी झाली आहे. चोरांनी धूम 2 च्या स्टाइलमध्ये चोरी केली, प्रथम विस्फोट करत म्युझियममध्ये शिरण्याचा मार्ग तयार केला, मग चोरी केली.
पोलिसांकडून जारी सीसीटीव्ही फुटेजमध्sय स्फोटापूर्वी संशयित बाहेरील दरवाजा उघडताना दिसून आले. फुटेजमध्ये धूर पसरताना दिसून येतो. चोरांनी तीन डॅसियन सोन्याची कंकणं आणि कोटोफेनेस्टी काळातील मुकूट नेला आहे. या मूल्यवान मुकूटाची निर्मिती 2500 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. तसेच म्युझियममध्ये तो आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. ही सर्व सामग्री डॅशियन्सविषयी एका प्रदर्शनाचा हिस्सा होती, एका प्राचीन समाज ज्याने रोमन्सकडून विजय मिळविण्यापूर्वी रोमानियाच्या बहुतांश हिस्स्यावर कब्जा करण्याची कामगिरी डॅशियन्सनी केली होती. डासिया : एम्पायर ऑफ गोल्ड अँड सिल्वरमध्ये रोमानियातील संस्थांकडून मागविण्यात आलेला खजिना दाखविण्यात आला आहे.
ड्रेंट्स म्युझियमने कोटोफेनेस्टीच्या हेल्मेटचा उल्लेख केला आहे. हा हेल्मेट सुमारे 100 वर्षांपूर्वी रोमानियाच्या गावात सापडला होता. याच्या डिझाइनमध्ये पौराणिक दृश्यं आणि डोळ्यांची जोडी दाखविण्यात आली आहे. हे हेल्मेट वाईट नजरेपासून वाचवत युद्धादरम्यान शत्रूंना रोखत असल्याचे मानले जाते. या चोरांना पकडण्यासाठी इंटरपोलसोबत काम करत आहोत असे डच पोलिसांनी सांगितले आहे. तपास अधिकारी एका करड्या रंगाच्या कारचा शोध घेत आहेत.









