आधुनिक उपग्रहीय तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे संशोधकांनी इजिप्तमध्ये इमेट नावाच्या प्राचीन शहराचा शोध लावला आहे. इमेट हे 2400 वर्षे जुने शहर असून हे चौथ्या शतकातील ख्रिस्तपूर्व कालीन आहे. पुरातत्वतज्ञांनी याला टेल एल-फरैनमध्ये शोधले आहे. हे इजिप्तच्या नील डेल्टामध्ये आहे. मँचेस्टर विद्यापीठ आणि कैरोच्या सादात सिटी विद्यापीठाच्या टीमने हा शोध लावला आहे. डॉ. निकी नील्सन यांनी या अभियानाचे नेतृत्व केले. इमेटमध्ये समृद्ध अर्थव्यवस्था होती, धार्मिक परंपराही होत्या असे आढळून आले आहे. नील डेल्टाच्या इतिहासाला आम्ही पुन्हा जिवंत करत आहोत असे टीमने म्हटले आहे. पुरातत्वतज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच हाय-रिझोल्युशन सॅटेलाइट इमेजरीचा वापर केला आहे. यामुळे जुन्या मातीच्या विटा मिळाल्या, त्यांच्याद्वारे बहुमजली इमारतीचे अवशेष मिळाले आहेत. या इमारतींचा पाया अत्यंत मोठा होता, त्यांना टॉवर हाउस नाव देण्यात आले आहे.
टॉवर हाउस नील डेल्टामध्ये मिळतात, इमेटमधील त्यांच्या अस्तित्वामुळे हे मोठ्या लोकसंख्येचे शहर होते असे कळते. या इमारती वाढत्या लोकसंख्येसाठी निर्माण करण्यात आल्या होत्या. इमेट एक शहरी केंद्र होते असे डॉ. नील्सन यांनी सांगितले. पुरातत्वतज्ञांना तेथे एक भवन मिळाले असून ते मध्य-प्टोलेमिक काळातील आहे.
टीमला धान्य प्रक्रिया क्षेत्रही मिळाले असून पशुंचे मोठे गोठेही आढळून आले आहेत. यातू इमेटची स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होती असे कळते. याचे शहरी नियोजन अन् अध्यात्मिक स्वरुपाचेही संकेत मिळाले आहेत. या शहराच्या शोधामळे इजिप्तच्या इतिहासाचा नवा अध्याय खुला झाला आहे. याची कहाणी प्राचीन इजिप्तची संस्कृती दर्शविणारी असल्याचे पुरातत्वतज्ञांनी सांगितले आहे. टॉवर हाउस आणि मंदिर याच्या शहरी संरचना दर्शवितात. वजेतचे मंदिर धार्मिक जीवनाचे प्रतीक आहे.









