इचलकरंजी:
येथील अनन्या राहुल चव्हाण ( वय 15) हिची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला प्रिमिअर लीग (डब्ल्यूएमपीएल) या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अष्टपैलू म्हूणन उत्कृष्ट कामगिरी करण्राया अनन्या ची रायगड रॉयल या संघात निवड झाली आहे. डॉ.राहूल चव्हाण इचलकराजी यांची अनन्या ही कन्या आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने राज्यातील उदयनोमुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी वुमन्स प्रीमियर लीग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धे अंतर्गत राज्यातील विविध संघांची विभागणी करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी राज्यात उत्कृष्ट कामगिरी करण्राया क्रिकेटपटू मुलींची निवड करण्यात आली आहे. अष्टपैलू म्हणून उत्कृष्ट कामगिरी करणारी अनन्या हिची या स्पर्धेसाठी निवड झाली असून ती रायगड रॉयल या संघाकडून खेळणार आहे. बालरोग तज्ञ डॉ.राहुल चव्हाण यांचे शालेय शिक्षण बेळगाव येथे झाले असून त्यांनीही शालेय जीवनात अष्टपैलू खेळाडू म्हणून लौकिक मिळवला होता. कन्या अनन्या हिला प्रोत्साहन देऊन त्यांनी उत्कृष्ट क्रिकेटपटू बनवले आहे. शालेय शिक्षण घेत असतानाच मिळवलेल्या यशाबद्दल अनन्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.अनन्या ने युनाइटेड पुणे संघाचे प्रतिनिधित्व करत प्रभावी कामगिरी बजावली आहे.
चॅम्पियन्स क्रिकेट अॅकॅडमीत प्रशिक्षित होण्राया अनन्या ला मुख्य प्रशिक्षक युवराज यवलुसकर यांचे प्रशिक्षण व ज्येष्ठ खेळाडू आनंदा दोपारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.









