आयुष्मान खुराना, परेश रावल, सीमा पाहवासोबत झळकणार
दिग्दर्शक राज शांडिल्य यांचा यशस्वी ठरलेला चित्रपट ‘ड्रीमगर्ल’चा सीक्वेल लवकरच तयार केला जाणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत अनन्या पांडेची महत्त्वाची भूमिका असणार आहे. तर चित्रपटात परेश रावल आणि सीमा पाहवा हे देखील दिसून येणार आहेत.
आयुष्मानचा सीमा पाहवा यांच्यासोबतचा हा चौथा चित्रपट असणार आहे. यापूर्वी दम लगा के हईशा, बरेली की बर्फी आणि बाला या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते. परेश रावल आणि सीमा पाहवा यांनी या फरारी की सवारी या चित्रपटात सोबत काम केल केले होते.

या चित्रपटात अनन्या पांडेच्या जागी सारा अली खान किंवा तेजस्वी प्रकाशची निवड होणार असल्याची चर्चा होती. परंतु अखेरीस अनन्याने बाजी मारली आहे. अनन्या पांडे सध्या पूरी जगन्नाथ यांचा चित्रपट लायगरचे प्रमोशन करतआहे. चित्रपटात तिच्यासोबत विजय देवरकोंडा झळकणार आहे.
अनन्या पांडे लवकरच ‘खो गए हम कहां’मध्ये दिसून येईल. यात तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव यांची महत्त्वाची भूमिका आहे. तर आयुष्यामन खुराना लवकरच ‘डॉक्टर जी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ड्रीम गर्ल या चित्रपटात आयुष्मानसोबत नुरसत भरूचा मुख्य भूमिकेत होती.









