वार्ताहर/किणये
कर्नाटक सार्वजनिक शिक्षण खाते व शारीरिक शिक्षण खाते यांच्यावतीने शारीरिक शिक्षकांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत मंगळूर,मुडबिद्री अल्वाज येथे झालेल्या स्पर्धेत अंनत पाटील यांना गोळाफेकमध्ये सुवर्ण पदक पटकविले आहेत. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत 40 वर्षाखालील वयोगटात गोळाफेकमध्ये 11.43 मी. इतके अंतर गोळाफेक लाभ फेकत सुवर्णपदक पटकविले. या स्पर्धेमध्ये कर्नाटक राज्यातील क्रीडा शिक्षकांनी सहभाग घेतला होता. अनंत पाटील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित कर्लेतील ज्योती हायस्कूलचे क्रीडा शिक्षक आहेत.









