बेळगाव : आनंदवाडी स्पोर्ट्स क्लब आयोजित आनंदवाडी चषक हाफपीच क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आनंदवाडी लेजेंड संघाने आनंदवाडी रॉयल संघाचा 19 धावांनी पराभव करून आनंदवाडी चषक पटकाविला.
आनंदवाडी मर्यादित या स्पर्धेत 10 संघांनी भाग घेतला होता. अंतिम सामना आनंदवाडी लेजेंड व आनंदवाडी रॉयल यांच्यात खेळविण्यात आला. आनंदवाडी लेजेंडने 6 षटकात 4 बाद 54 धावा केल्या. त्याला उत्तर देताना आनंदवाडी रॉयल संघाने 6 षटकात 7 बाद 35 धावाच केल्या.
हा सामना लेजेंड संघाने 19 धावानी जिंकला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे शशिकांत रनदिवे, हेमंत मुचंडी, बाळू कुरळे, शशिकांत पाष्टे, प्रताप श्रेयकर, प्रताप पाटील, परशराम कडोलकर व गणेश चौगुले यांच्या हस्ते विजेत्या आनंदवाडी लेजेंड संघाला आकर्षक चषक व उपविजेत्या आनंदवाडी रॉयल संघाला चषक, रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संतोष कडोलकर, प्रदीप कामोजी, किरण कामोजी, संदीप काकतीकर, गणेश चौगुले, अभिषेक गौडा, मंगेश काकतीकर, श्रीराम पोटे, सुरज पाटील, विनायक अष्टेकर, सुरेश पाटील, सुमित चापोळकर व गणेश मुतगेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.









