मडगाव : ‘काळजी’ मानसिक आरोग्य काळजीवाहू संघटना, मडगाव यांनी लायन्स क्लब ऑफ मडगाव-रावणफोंड यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष दिव्यांग तऊण आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांसाठी ‘आनंद’ मेळाव्याचे हल्लीच आयोजन केले. ‘काळजी’ हा मानसिक आरोग्य क्षेत्रातील नामवंत नाव असलेल्या डॉ. राजेंद्र हेगडे यांनी पाच वर्षांपूर्वी स्थापन केलेला उपक्रम आहे. मानसिक समस्या, विशेष मुले आणि विशेषत: त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांना आधार देण्याच्या आणि त्यांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने याची सुऊवात करण्यात आली होती. ‘काळजी’-असोसिएशन मेंटल हेल्थ केअरर्सचे अध्यक्ष विश्वंभर केंकरे यांनी पाहुण्यांचे आणि मेळाव्यात सहभागी झालेल्या सर्वांचे स्वागत केले आणि असोसिएशनच्या उद्दिष्टांची माहिती दिली. पुढे त्यांनी या ‘काळजी’ मध्ये सहभागी होऊन उद्दिष्टानुसार गरजूंची सेवा करण्याचे आवाहन केले. लायन्स क्लबचे विजय मोपकर यांनी सूत्रसंचालन केले. लायन्स क्लबचे सदस्य माऊती अय्यर, विनायक नार्वेकर, डॉ. राजेंद्र हेगडे आणि प्रख्यात बालरोगतज्ञ डॉ. नीलेश उसगावकर यांचेही रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. लायन्स क्लबचे माऊती अय्यर यांनीही या वेळी उपस्थितांना संबोधित केले. डॉ. राजेंद्र हेगडे आणि डॉ. उसगावकर यांनी आपल्या भाषणात अशा कार्यक्रमांना मानसिक त्रास झालेल्या लोकांच्या आणि त्यांच्या काळजीवाहूंच्या फायद्यासाठी पाठिंबा देण्याची गरज व्यक्त केली.
वसंत सावंत (कोकणी लेखक), कोकणी अकादमीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक, चेतना ट्रस्ट, कुडचडे यांच्यासमवेत दुर्गादास नाईक यांनी आपल्या जादुई कौशल्याने उपस्थितांचे मनोरंजन केले. डॉ. व्यंकटेश हेगडे सुप्रसिद्ध फिजिशियन, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रगत अभ्यासक्रम शिक्षक यांनी ‘आनंद मेळावा’ साठी उपस्थित लोकांच्या फायद्यासाठी एक छोटेसे सत्र आयोजित केले. शेवटी काळजी सदस्या सौ. वर्षा देसाई आणि अमानसिओ फर्नांडिस या दोघांनी विशेष दिव्यांग तरूणांसाठी विविध खेळांचे आयोजन केले. विशेष तरूणांकडून खेळांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला, त्यांनी मनापासून भाग घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते. त्यांना कौतुकाचे प्रतीक म्हणून एक छोटी भेटवस्तू देखील देण्यात आली होती. काळजीचे सक्रिय सदस्य अमानसिओ फर्नांडिस यांनी आभार मानले. विशेष दिव्यांग तऊणांच्या फायद्यासाठी कम्युनिटी सेंटर सुरू करण्यासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांनी उपस्थितांना केली. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व लायन्स क्लबच्या सदस्यांना प्रेम आणि कृतज्ञता आणि त्यांच्या पाठिंब्याचे प्रतीक म्हणून रोपटे देखील देण्यात आली. काळजीचे सदस्य अमानसिओ फर्नांडिस, विवेकानंद पाटील सदस्य, श्रीमती. वर्षा देसाई, सचिव राम नाईक, खजिनदार मंजुषा तळावलीकर व विजय मोपकर यांनी हा विशेष उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.









