पैशाच्या वादातून खून केल्याचा होता आरोप : अल्ट्राटेक कंपनीसमोरील घटना
प्रतिनिधी/रत्नागिरी
रत्नागिरीतील व्याजी व्यावसायिक आनंद क्षेत्री याचा खूनाच्या आरोपातून दोघाही संशयितांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. किरण मल्लीकार्जून पंचकट्टी (22, ऱा गुलबर्गा कर्नाटक) लक्ष्मण कांताप्पा शिंदे (35, ऱा उद्यमनगर रत्नागिरी, मुळ सोलापूर) अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पैशाच्या वादातून आपल्याच मित्राचा बंदुकीची गोळी झाडून खून केल्याचा आरोप पंचकट्टी याच्यावर ठेवण्यात आला होता. तर पंचकट्टी याला मदत केल्याप्रकरणी शिंदे याला सहआरोपी करण्यात आले होते. सबळ पुराव्याअभावी दोघांचीही न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा 6 जानेवारी 2019 रोजी उद्यमनगर एमआयडीसी येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीसमोरील रस्त्यावर आनंद बलभीम क्षेत्री (35, ऱा झाडगांव, एमआडीसी) या तरूणाचा डोक्यात बंदुकीची गोळी घालून खून करण्यात आला होता. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली होती. पोलीस तपासात आनंद क्षेत्री याचा मित्र किरण पंचकट्टी यानेच पैशाच्या व्यवहारातून क्षेत्री याचा खून केल्याचे उघडकीस आले होते. तर खूनातील बंदुक लपवल्यापकरणी शिंदे याच्यावरही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
किरण पंचकट्टी हा मुळचा कर्नाटक येथील गुलबर्गा येथील राहणार असून तेथील पोलीस ठाण्यात त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा कर्नाटक पोलिसांकडून होणाऱ्या अटकेच्या भीतीने तो फरार होवून मृत क्षेत्री याच्या घरी वास्तव्यास होता. दरम्यान क्षेत्री हा व्याजी पैशाचा व्यवहार करत असल्याने त्याच्या कामात पंचकट्टी हा त्याला मदत करत होता. दोघांचाही व्यवसाय जोर पकडत असल्याने क्षेत्रीने आपल्याला गाडी घ्यायचे असल्याचे पंचकट्टीला सांगितल़े त्यासाठी आरोपीने मुद्रा कर्ज योजनेतून 9 लाखाचे कर्ज उचलले होते. त्यामधील 3 लाख रूपये त्याने क्षेत्री याला गाडी घेण्यासाठी दिले होते. मात्र हे पैसे क्षेत्री परत करत नसल्याचे आरोपीच्या लक्षात आल्यानंतर त्या दोघांमध्ये खटके उडण्यास सुरूवात झाली होत़ी खून झाल्याच्या दोन दिवसापूर्वी क्षेत्री व आरोपी पंचकुट्टी यांच्यात पैशावरून जोरदार वाद निर्माण झाला असता क्षेत्री याने पंचकुट्टीच्या कानाखाली लगावली होती, असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते.
6 जानेवारी 2019 रोजी रात्री आनंद क्षेत्री हा अल्ट्राटेक सिमेंट कंपनीशेजारी असणाऱया बारमध्ये आपल्या मित्रांसोबत बसला होत़ा रात्री 9 च्या सुमारास पंचकट्टी हा त्या ठिकाणी आल्यानंतर ते दोघेही कारमधून घराच्या दिशेने जाण्यासाठी निघाले होत़े यावेळी हा मुद्दाम मागच्या सिटवर बसला होता तर क्षेत्री हा कार चालवत होता. दरम्यान गाडी चालू होताच पंचकट्टी याने क्षेत्री याचे नावे असलेली बंदूक हातात घेत क्षेत्री याच्या उजव्या कानाजवळ एक राऊंड फायर केला, असा आरोप पंचकट्टी याच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी पंचकुट्टीविरूद्ध भादंवि कलम 302 नुसार गुन्हा करण्यात आला. तसेच लक्ष्मण शिंदे याला सहआरोपी करण्यात आले होते. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले.









